Blog list

Compellingly and knowledge sharing blogs personally drafted by qualified doctors of Bapaye Eye Hospital (Nashik) in English as well as Marathi.

what-is-diabetic-retinopathy.jpg?time=1599794438
27/Apr/2020

भारतातील व भारतीय उपखंडातील समाजामध्ये मधुमेहाचे प्रमाण जवळ जवळ १८% इतके वाढले आहे. जगातील इतर लोकांपेक्षा हे  खुपच जास्त आहे. डोळे, मूत्रपिंड, हातापयाच्या नसा, ह्रदय, मेंदू इत्यादि महत्वाच्या अवयावांवर मधुमेहाचा दुष्परिणाम होउन प्राणघातक व दृष्टिभक्षक आजार होऊ शकतात. डोळ्यात मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपचार याची आपण माहिती घेऊ.  

डोळ्यांची रचना: 

     डोळा कॅमेर्याप्रमाणे काम करतो. कॅमेर्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व प्रतिमा तयार होते. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेर्यची फिल्मच आहे. या नेत्रपटलावरील मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपतालाच्या इतर भागंपेक्षा अनेक पटीने जास्त. मॅक्युलाचे आजार दृष्टिचे अतोनात नुकसान करतात. डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर  समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते.मेंदूमध्ये नजरेचे आकलन होते.

मधुमेहाचे प्रकार

टाइप 1: ह्या प्रकारात शरीरात इन्सुलिन तयार करणाऱ्या ग्रंथी जन्मतः उपलब्ध नसतात अथवा अत्यल्प प्रमाणात असतात. हा विकार लहान वयात होतो आणि इन्सुलिनची इंजेक्शन घेणे हाच त्यावर सहसा उपाय असतो. 

टाइप 2: ह्या प्रकारात शरीरातील इन्सुलिन चे कार्य योग्य पद्धतीने होवू शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखर पेशीमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि रक्तातील साखर वाढते. हा विकार सहसा मध्यमवयीन अथवा वयस्कर रुग्णांना होतो. स्थूलपणा, उच्च रक्तदाब इत्यादी विकार ह्या प्रकाराशी निगडित असतात. योग्य आहार, व्यायाम आणि औषधोपचाराने या विकाराचा उपचार होतो. 

या दोन्ही प्रकारच्या मधुमेहामध्ये नेत्र विकार संभवतात.

मधुमेह व नेत्रविकार : 

 मधुमेहामुळे खालील नेत्रविकार जडण्याची शक्यता असते 

१) वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे.                                                २) रांजणवाडी येणे 

३) डोळ्यात होणारे रक्तस्त्राव                                                        ४) मोतीबिंदू

५) काचबिंदू                                                                                 ६) दृष्टीचेतेस सूज येणे (optic neuritis)

७)अचानक येणारा तिरळेपणा व वस्तू दोन दिसणे (double vision) ( डोळ्यांची हालचाल करणार्या स्नायुंचे पॅरॅलिसिस झाल्यामुळे)  

८) मधुमेह नेत्रपटल विकार(डायबेटिक रेटिनोपॅथी) 

या सर्वांतील डायबेटिक रेटिनोपॅथी ( यापुढे याला डा. रे. असे संबोधले आहे) हा विकार सर्वात भयंकर आहे. त्यामुळे येणारे अंधत्व निवारण करणे अतिशय अवघड ठरू शकते. जवळ जवळ प्रत्येक मधुमेही रुग्णाला डा. रे. चा विकार हा होतोच.२० वर्षात जवळजवळ ९०% रुग्णांना डा. रे. म्हणून त्याच्या विकार आपण विस्ताराने करू.

डायबेटिक रेटिनोपॅथी कारणमीमांसा वा प्रकार 

१)NPDR( Non- proliferative D.R)- निरोगी नेत्रपटलावरील रक्तवाहिन्या मधून रक्तातले घटक झिरपू शकत नाहीत. परंतु डा. रे. चा मधील रक्तवाहिन्यांत येणाऱ्या विकृतीमुळे रक्तातील द्रव्य पदार्थ वा लालपेशी बाहेर झिरपतात. त्यामुळे नेत्रपटलास सूज येते. लाल रक्ताचे ठिपके दिसू लागतात. बाहेर आलेले कॉलेस्ट्रॉल चे पिवळे ठिपके दिसू लागतात.

२) PDR (Proliferative D.R)- ही NPDR च्या पुढची अवस्था आहे. यामध्ये नेत्रपटलावरील केशवाहीन्या नष्ट होऊ लागतात. साहजिकच त्या नेत्रपटलाच्या ज्या भागाचे पोषण करतात, तो प्राणवायू विना गुदमरू लागतो. म्हणून तेथे नवनिर्वाचित रक्तवाहिन्यांचे जाळे तयार होते. या फारच नाजूक व कमकुवत असल्यामुळे त्या फुटतात व रक्तस्त्राव होतो. त्यांच्या निर्मितीबरोबरच नेत्रपटलवर कोळी श्टकासारखे जाळे तयार होते. अखेर याची परिणती डोळ्यातील रक्तस्त्राव व रेटायनल डिटॅचमेंट या भयंकर दृष्टीनाशक रोगात होते.

३) Maculopathy (मॅक्युलोपॅथी)- आपण वर पाहिले आहे की मॅक्युला या दृष्टीचा जणू प्राणच आहे. त्यालाच जर मधुमेहाने इजा झाली तर, सूज आली तर लिखाण, वाचन, टी. व्ही. पाहणे इत्यादीसाठी लागणारी तीक्ष्ण दृष्टी नष्ट होती.

नेत्रपटलाच्या तपासण्या

१) नेत्रपटल तपासणी (Funduscopy)- डायबेटिस असलेल्या प्रत्येक रुग्णाने वेळोवेळी डोळ्यांच्या डॉक्टरकडे ही तपासणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करून indirect ophthalmoscope उपकरणाने नेत्रपटल तपासणी केली जाते.

२) फंडस फोटोग्राफी- फंडस कॅमेरा या मशीनने नेत्रपटलाच्या विविध भागांचे फोटो काढून नेत्रपटलाचा नकाशा तयार केला जातो. व्हेन ओक्लुजन चे स्वरुप समजण्यास व पुढील कळामध्ये संधार्भास याचा उपयोग होतो.

३) फ्लुरेसिन अँजिओग्राफी (F. F. A)-

डायबेटिक रेटिनोपथी हा रक्तवाहिन्यांचा विकार असल्याने अँजिओग्राफी अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये फ्लुरेसिन औषधाचे इंजेक्शन हाताच्या शिरेत देऊन ते औषध नेत्रपटलावारिल रक्तवहिन्यात आले की त्याच्या प्रवासाचे एका पाठोपाठ एक फोटो काढले जातात व त्यावरून पडद्याच्या विक्रुतिची पूर्ण कल्पना येते व उपचारांची दिशा ठरविली जाते.

४) आय. सी. जी.(ICG Angiography) 

इंडोसायनीन ग्रीन हे औषध शिरेत टोचून नेत्रपटलावारिल कृष्णपटलाची अँजिओग्राफी केली जाते. ही विशेषतः मॅक्युलासाठी असते.

५) ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी (OCT)

ही अत्याधुनिक तपासणी मॅक्युलावर झालेल्या दुष्परिणाम अचूकपणे मापन करते. या तपासणीने मॅक्युलाला सूज आली असेल तर त्याचे निदान व तीव्रता मोजली जाते. त्याचप्रमाणे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम देखील O.C.T. ने बघता येते.

 

१) लेसर 

लेसर म्हणजे प्रकाशातील विवक्षित लहरींची शक्ती वाढवून त्यांना सामर्थ्यशाली बनविले जाते व प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्यांच्याद्वारे उपचार केले जातात.

लेसर कसे कार्य करते ?

 दृष्टिअपाचारासाठी अत्यंत सूक्ष्म आकाराचे लेसर किरण उपयोगात आणले जातात. त्यामुळे नेत्रपटलाचे नुकसान होत नाही तर –

१) फक्त विकृत रक्तवाहिन्या  नष्ट केल्या जातात.(Focal Treatment ) 

२) नविन दोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वच नेत्रपटलावर लेसर उपचार करतात ( PRP- Pan Retinal Photo Coagulation)

लेसर उपचार पद्धती साधी आहे व रुग्णास त्रासदायक नाही. यामध्ये डोळ्यात औषध घालून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते व स्लिट लंप या यंत्रणा वर बसून डोळ्यात लेझर चे किरण सोडले जातात.१५-२० मिनिटात हे लेसर उपचार पूर्ण होऊन रुग्ण घरी जातो.

लेसर उपचारानंतर काही दिवस दृष्टी मंद झाली आहे असे वाटते.परंतु ती लवकरच पूर्ववत होते. लेसर उपचार ही प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली आहे म्हणजेच जी दृष्टी नष्ट पवाली आहे ती या उपचाराने परत मिळत नाही. परंतु यामुळे सद्यस्थितीतील दृष्टी वाचवली जाते व अंधत्व टाळता येते. म्हणुनच डा. रे. प्राथमिक अवास्तेत असताना हे उपाय करावेत. एकदा लेसर केले तरी नविन जगी डा. रे. येऊ शकते म्हणून उपचारानंतरही नेत्रपरिक्षा करीत रहाणे जरुर आहे.

२) डोळ्यातील इंजेक्शन 

   हे इंजेक्शन डोळ्याच्या आत (व्हीटियस मध्ये) दिले जाते. डोळ्यात जन्तुसंसर्ग होऊ नये म्हणून हे इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये द्यावे लागते. काही वेळा 2 इंजेक्शन एका वेळी द्यावी लागतात. काही रुग्णांमध्ये पुन्हा इंजेक्शन द्यावी लागण्याची शक्यता असते.

अ) अँटी वि. ई. गी. एफ इंजेक्शन: ही इंजेक्शन डोळ्यातील कमी न होणारा रक्त्त्राव, लेझरपूर्वी किवा नंतरही नेत्रपटलावरील पसरलेले रक्तवाहिन्यांचे जाळे कमी करणे, मॅक्युलाला व दृष्टीचेतेला येणारी सूज कमी करणे यासाठी वापरले जाते. ह्या इंजेक्शन चा काहीही दुष्परिणाम होत नाही.काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्या पूर्वी हे इंजेक्शन दिले जाते. सद्य स्थितीत ही ३ प्रकारची इंजेक्शन उपलब्ध आहेत. Bevacizumab ( Avastin), Ranibizumab (Razumab/Accentrix किंवा Lucentis) आणि Aflibercept ( Eylea). 

यापैकी Avastin हे इंजेक्शन मूलतः कॅन्सरच्या विकारात वापरले जाते. परंतु सन २००५ पासून मोठ्या प्रमाणात नेत्र विकारात ह्या इंजेक्शन चा वापर केला गेला आहे. डोळ्यांच्या विकारात ह्यावर जगभरात अनेक अभ्यास केले गेले आहेत. पण, डोळ्यांच्या आजारात ह्या इंजेक्शन च वापर off label समजला जातो. इतर दोन प्रकारची इंजेक्शन नेत्र विकरांसाठी बनवली गेली आहेत. 

ब) स्टरॉइड : हे इंजेक्शन मॅक्युलाला येणारी सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. ह्यामध्ये डोळ्याचे प्रेशर (काचबिंदू) आणि मोतीबिंदू वाढण्याची शक्यता असते व त्यासाठी डॉ. च्या कडे तपासणी करावी.

क) ओझेरडेक्स : हे स्टरॉईडस च अत्याधुनिक प्रकारचे इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन डोळ्यात ३ ते ४ महिन्यांपर्यंत राहते. मॅक्युलाला येणारी सूज कमी करण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. ह्यामध्ये काचबिंदू व मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी असते.

३) डा. रे. व शस्त्रक्रिया  

ह्या शस्त्रक्रियेला व्हीटरेक्टोमी असे म्हणतात. यामध्ये डोळ्यातील व्हीटरिअस व त्यामधील रक्तस्त्राव व नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांचे जाळे काढले जातात. ह्यामध्ये लेसारचाही उपयोग केला जातो. अत्याधुनिक (२३ किवा २५ गेज) पद्धतीने केल्यामुळे टाके न घालता शस्त्रक्रिया करता येवू शकते. हा आजार अत्यंत गंभीर असल्यामुळे नजर सुधारण्यास कालावधी लागतो व येणारी नजर आजार किती गंभीर आहे व किती दिवसांपासून आहे यावर अवलंबून असते. कैक वेळा एकापेक्षा अधिक वेळा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. जर मोतीबिंदू असेल तर दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी कराव्या लागू शकतात. तसे शक्य नसेल तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रथम केली जाते.

 

मधुमेही रुग्णांची नेत्रतापासणी कधी करावी

१) ज्यावेळी मधुमेहाचे निदान होईल त्यावेळी प्रथम नेत्रपटल तपासणी करावी व नेत्रपटलाचे फोटो काढून ठेवावेत. जर प्रथम तपासणीत डा.रे. आढळली तर पुढील तपासण्या करून आवश्यक उपचार करावे लागतात.

२) जर प्रथम तपासणीत डा.रे. आढळली नाही तर दर सहा महिन्यांनी नेत्रपटल तपासणी करावी. 

३) ज्या तपासणीमध्ये आजार आढळेल, त्यावेळी पुढील तपासण्या करून आवश्यक ते उपचार करावे. 

४) एकदा डा.रे. चा आजार आढळला की दर ३ महिन्यांनी नेत्रपटल तपासणी करावी.

५) डा.रे. चा रोग बळवण्या आधीच लेसर उपचार करावेत.

६) लेसर अथवा इतर उपचारानंतर ही दर ३ महिन्यांनी नेत्रपटल तपासणी अत्यावश्यक आहे.

७) मधुमेह नेहेमी नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात नसल्यास उपचारानंतर देखील डोळ्यातील आजाराची वाढ होऊन अंधत्व येवू शकते.

मधुमेहाची सांगत त्रासदायक होऊ नये म्हणून आपण – 

१) औषध व आहार याकडे दुर्लक्ष करू नका.

२) रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवा. यामुळे डा. रे. वाढू नये यासाठी फायदा होतो.

३) ठराविक व्यायाम करा. 

४) रक्तदाब आटोक्यात ठेवा. 

५) धूम्रपान, दरुपासून दूर रहा

६) जर डा. रे. असेल तर किडनी विकरांसाठी तपासणी करून घेण्यास विसरू नका. 


shutterstock_553769011.jpg?time=1599794438
04/Apr/2020

डोळा कॅमेर्याप्रमाणे काम करतो. कॅमेर्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेर्यची फिल्मच आहे. या नेत्रपटलावारिल मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपतालाच्या इतर भागंपेक्षा अनेकपटीनी अधिक. आपण जेव्हा एखादया वस्तूकडे पहातो तेंव्हा डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर  समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते.

निरोगी नेत्रपटल डोळ्याच्या मागील भागात अलगद चिटकले असते . भिंग (लेन्स) व नेत्रपटल यामधील जागा व्हीटरिअस नावाच्या जेलिसरख्या पदार्थाने व्यापलेली असते. व्हीटरिअस नेत्रपटलाला काही ठिकाणी घट्ट चिकटलेले असते. नेत्रपटल जेव्हा जागेवरून सुटून येते, तेव्हा त्याचे कार्य होऊ शकत नाही.यालाच रेटायनल डिटॅचमेंट असे म्हणतात. नजर वाचविण्यासाठी नेत्रपटल लवकरात लवकर पूर्ववत जागेवर बसविणे अत्यावश्यक असते. त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.

वाढत्या वयाप्रमाणे व्हीटरिअसचे जेलिपासून पाण्यासारख्या पदार्थात रूपांतर होते. एका विशिष्ट वेळी व्हीटरिअस नेत्रपटलापासून सुटून येते, याला पोस्टिरियर व्हीटरिअस डिटॅचमेंट (पि. व्ही. डी) असे म्हणतात. जवळ जवळ १००% लोकांमध्ये चाळिशी किवा पन्नशिमध्ये ही प्रक्रिया होते. P.V.D नंतर रुग्णांना डोळ्यासमोर अचानक काळे बिंदू फिरताना दिसू लागतात. याला फ्लोटर्स असे म्हणतात. काही रुग्णांना वीज चमकल्याप्रमाणे आभास होतो. व्हीटरिअस चा नेत्रपटलावर ताण आल्यामुळे असे जाणवते.

बव्हतांशी लोकांमध्ये P.V.D  नंतर नेत्रपटलाला इजा होत नाही. परंतु काही रुग्णांमध्ये नेत्रपटलावरचा ताण जास्त असल्याने नेत्रपटलाला भोक पडते. याला हॉर्स शू टेअर किवा रेटीनल होल असे म्हणतात. काही रुग्णांमध्ये नेत्रपटलात कमकुवत जागा असतात. त्याला सहसा लाटिस डीजेनेरशन असे म्हणले जाते. अशा कमकुवत जागी नेत्रपटलात छिद्र पडण्याची शक्यता जास्त असते. वेळीच लक्षात न आल्यास आजार पराकोटीला जाऊन नेत्रपटल जागेवरून सरकते. म्हणजेच रेटीनल डिटॅचमेंट होते. वृध्दत्व, ह्स्वदृष्टी, डोळ्यावरील शस्त्रक्रिया, डोळ्याला गंभीर इजा होणे हे काही रिस्क फॅक्टर आहेत.

रेटीनल डिटॅचमेंट सुरू होताना डोळ्यासमोर काळा पडदा पडल्यासारखं वाटते. जसजसा आजार वाढतो, तसतशी नजर कमी होत जाते. लवकर शस्त्रक्रिया न केल्यास नजर परत येवू शकत नाही.

उपचार पद्धती

) लेसर: नेत्रपटलास पडलेले छिद्र रेटीनल डिटॅचमेंट होण्याअगोदर दिसून आले, तर लेसर किरणांनी त्याच्या सभोवतालचे नेत्रपटल घट्ट करता येते. त्यामुळे रेटिनाल डिटॅचमेंट होण्याची शक्यता बरीच कमी होते. लाटिस डीजेनेरशनच्या भागालासुद्धा लेसर किरण द्यावे लागू शकतात. लेसर उपचारांनी रेटीनल डिटॅचमेंट होण्याची शक्यता बरीच कमी होते मात्र काही प्रमाणात हि रिस्क राहतेच.

लेसर उपचार करण्यासाठी आजार लवकरात लवकर लक्षात येणे अत्यावश्यक असते. लेसर उपचार करण्यासाठी केवळ काही मिनिटांचा कालावधी लागतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारची भुल देण्याची गरज नसते.

) न्यूमाटिक रेटिनोपेक्सी: काही विशिष्ट रुग्णांमध्ये डोळ्याच्या आत हवेचा बुडबुडा सोडला जातो. या हवेच्या प्रेशरने नेत्रपटल जागेवर ढकलले जाते. ते तसे टिकावे म्हणून क्रायो प्रक्रिया केली जाते. केवळ काही विशिष्ट प्रकारच्या रेटीनल डिटॅचमेंटमध्येच ही शस्त्रक्रिया करता येवू शकते.

) स्क्लेरल बक्कल: या शस्त्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी नेत्रपटलास भोक पडले असते, त्याच्या बाहेरील बाजूस सिलिकॉन रबरचा तुकडा शिवला जातो. यामुळे डोळ्याचे बाहेरील थर आतील बाजूस ढकलले जातात. त्याचबरोबर नेत्रपटलाखली जमा झालेले पाणी बाहेर काढून टाकले जाते. त्यामुळे नेत्रपटल पूर्ववत जागेवर जाऊन बसते.

) व्हीटरेक्टोमी: या शस्त्रक्रियेमध्ये, बुबुळाच्या बाजूला छोटी छिद्रे पाडून त्यात पातळ पेन्सिलसरखी यंत्र डोळ्याच्या आतमध्ये घातली जातात. नेत्रपटलावर ताण आणणारे व्हीटरिअस पूर्णतया काढून टाकले जाते. नेत्रपटल जागेवर बसवून, ते तसे टिकावे यासाठी लेसर उपचार केले जातात. लेसर चा परिणाम येईपर्यंत नेत्रपटल जागेवर टिकावे यासाठी डोळ्याच्या आतमध्ये सिलिकॉन ऑईल किवा गॅस भरला जातो. सिलिकॉन ऑईल भरल्यास ते ३ ते ४ महिन्यांनी दुसरी छोटी शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागते. गॅस भरलेला असल्यास तो हळूहळू (४ ते ६ आठवड्यात) कमी होतो. परंतु गॅस डोळ्यात असेपर्यंत नजर अंधुक असते.

अनेक रुग्णांमध्ये यासर्व पद्धती एकत्र कराव्या लागतात.

शस्त्रक्रियेचा मुख्य हेतू नेत्रपटल जागेवर बसवणे हा आहे. त्यानंतर येणारी नजर ही नेत्रपटलात असलेल्या शक्तीवर अवलंबून असते. रेटायनल डिटॅचमेंट शस्त्रक्रियेनंतर येणारी नजर मोतीबिंदू च्या शस्त्रक्रियेनंतर येणाऱ्या नजरेसारखी नसते. जसजसा शस्त्रक्रियेस उशीर होत जातो, तसतसे नेत्रपटल अधिकाधिक कमकुवत होते व रुग्णास नजर येण्याची शक्यता कमी कमी होत जाते. म्हणूनच ही शस्त्रक्रिया इमेर्जन्सी तत्वावर केली जाते.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर ३ ते ४ तासात रुग्णांना घरी जाता येते. त्यानंतर ३ आठवडे डोके खाली घालून झोपण्याचा अथवा बसण्याचा व्यायाम करावा लागतो. या कालावधी नंतर घरातील कामे सुरू करता येतात. परंतु कमरेखाली वाकणे, जड वजन उचलणे किंवा जास्त व्यायाम करणे टाळावे.

अत्याधुनिक शस्त्रक्रियेने या गंभीर आजाराचा उत्तम इलाज करता येतो. परंतु काही रुग्णांमध्ये नेत्रपटल आक्रसून येते व जागेवरून पुन्हा सुटू शकते. या रुग्णांमध्ये पुन्हा शस्त्रक्रिया करून नेत्रपटल जागेवर बसवावे लागते. प्राथमिक शस्त्रक्रिया लवकरात लवकर केल्यास हे होण्याची शक्यता कमी होते. या शत्रक्रियेनंतर रुग्णांनी वारंवार डोळ्याची तपासणी करणे, डोळ्याचे प्रेशर चेक करणे अत्यावश्यक आहे.


shutterstock_553769011.jpg?time=1599794438
04/Apr/2020

In our last blog we have discussed the structure of the eye. However just to refresh our memory, an eye works like a camera. The light coming from an object is focused by the cornea and the lens, which act as focusing mechanisms, onto the film of the eye, known as the retina. The space between the back of the lens and the retina is filled with a jelly-like substance known as vitreous.

The vitreous is attached to the retina throughout in young age group. However, as a person grows old the vitreous starts becoming liquefied and separates from the retina. This process is known as posterior vitreous detachment (PVD). It happens in middle age people and is usually a harmless natural process. Most of the patients feel the presence of black spots, floaters,  suddenly appearing in front of the eye and some patients may also feel lightning flashes inside the eye. Over a period of 1 to 2 months the flashes and the floaters reduce in frequency and severity.

However in certain patients, the vitreous is densely attached to the retina at certain points. When posterior vitreous detachment takes place, at these points of dense adhesions retina gets torn. These pairs are known as horseshoe tears (HST) or retinal holes depending on their appearance. In some individuals, there are areas of pre-existing weakness in the peripheral part of the retina known as lattice degeneration. The retina gets torn easily at the sites of lattice degeneration.

Through these holes the liquefied vitreous goes behind the retina. The retina gets separated from the choroid in these patients. This is known as retinal detachment. Since the retina cannot function normally, the vision of the eye starts deteriorating. In early stages the patient may feel like a curtain falling in front of their eyes. Certain patients may feel a sudden increase in the number of floaters or an increase in the intensity of flashes of light. The vision significantly reduces when macula gets detached.

METHODS FOR TREATMENT:

1. Retinal laser

In this treatment modality very intense light is used to strengthen the retina around the area of tear or lattice degeneration. If a horseshoe tear or retinal hole is detected before retinal detachment develops or in early stages of retinal detachment, retina laser can be used to avoid the development or progression of retinal detachment, so that it does not threaten Central vision. Chances of progression of retinal detachment are much less after retinal laser though it may still happen in a few patients as it takes about 10 to 14 days for the effect of laser is fully achieved. A retinal laser can also be done prophylactically in patients with extensive lattice degeneration especially if the patient has developed retinal detachment in other eye or has a strong family history of retinal detachment.

2. Pneumatic retinopexy

In this procedure, a small bubble of gas known as C3F8 or SF6 is injected in the vitreous cavity. This pushes the detached retina back in its place. To keep the retina in its place cryopexy is done. This procedure is useful in very few patients who have a retinal detachment of the superior quadrant and have one or two retinal tears very close to each other.

3. Scleral buckle

In this procedure a small piece of silicone rubber is the suture to the sclera over the area where the retinal tear is present and the fluid present under the retina is removed externally.  This pushes the sclera and retina towards each other. To keep the retina in its place external cryopexy is done before suturing the silicone rubber. Usually post-operatively there is significant redness of the eye and pricking sensation for a period of 1 to 2 months following scleral buckle this procedure is generally done in younger age group patients. It may also be performed along with vitrectomy surgery.

4. Vitrectomy

In this procedure tiny incisions are made in the sclera, around the cornea about 3.5 mm behind the limbus. Very thin pencil-like instruments are inserted in the vitreous cavity. The vitreous which is causing traction on the retina is completely removed and retina is pushed back in its place with air. To retain the retina in its place retinal laser is done intraoperatively. Till the effect of laser comes, the vitreous cavity is filled with medical-grade silicone oil or C3F8 / SF6 gas. If silicone oil is used it needs to be removed after 2 to 4 months which requires another surgery. If gas is used it gets absorbed over a period of 1 to 2 months. But till the time gas gets absorbed vision is very low. Whether to use gas or silicone oil depends on the surgeon’s choice in a particular case. As mentioned before vitrectomy may have to be combined with a scleral buckling procedure. The patient is usually advised to maintain a face-down / prone position for three weeks after the surgery. This has to be maintained for 12 to 14 hours per day.

The purpose of retinal detachment surgery is to reattach the retina in its original place. The vision that the patient gets after surgery depends on the strength of the vision cells in the retina. Vision may not be as clear as one gets after cataract surgery or that present in other normal eyes. However if the surgery is delayed the chances of retina settling in place permanently get reduced and vision recovery is also very poor. Hence the surgery has to be performed on an emergency or priority basis depending on the case scenario in a particular case.

In certain cases even after the surgery the retina gets contracted and detaches from its place again. In such cases repeat surgery may be necessary.

The results of retinal detachment surgery are very gratifying with improvements in surgical techniques and instrumentation in today’s era. However the retinal detachment must be diagnosed and operated upon at the earliest to save the eye and to save the vision.


Viral.jpg?time=1599794438
25/Mar/2020

Emergency eye care

The eye is the most sensitive organ in the body that is exposed to the outside world. Though it is protected from all sides by a bony box known as the orbit of the eye, front of the eye is open to the outside world and hence vulnerable to injury.

Road traffic accidents are one of the most common ways that an eye can get injured. It is always advisable to use safety measures like the use of helmet on two-wheelers and seat belts in cars.
In cases where these measures are not used, the eye can get seriously injured. The video shows one such case or a young individual who had fall from two-wheelers. His glasses had broken and one-piece went in back of the eye known as Vitreous cavity. He had undergone suturing of the corneal injury 2-3 weeks before retinal surgery.

During the retinal surgery very thick vitreous hemorrhage can be seen. This hemorrhage is cleared and glass piece stuck inside removed. Glass foreign bodies inside the eye are very difficult to remove since they are slippery and can’t be firmly held with devices available. The video demonstrates the use of claw forceps which were extensively used to remove pellets from the eyes of victims in Kashmir after the 2016 unrest.

This has been developed by Dr. Maneesh Bapaye of Dr. Bapaye Hospital and it can be used to remove objects such as glass pieces or stones or shotgun pellets. At the end of surgery intraocular lens was implanted by scleral fixation technique. A very severe injury is treated successfully with a single surgery


Untitled-1-1-1200x1200.jpg
09/Mar/2020

Holi and Rangpanchami are festivals of color. They signify the end of the cold winter and welcome warmth and gaiety. However, it is up to us to take care that this festive mood is not spoilt by eye injuries caused by color going into the eye.

The first type is a mechanical one, due to physical trauma (by hand/fingernails). It could range from a superficial corneal (outer transparent portion of the eye) abrasion to a large corneal epithelial defect. This causes watering, pain, and light sensitivity. It needs to be treated as soon as possible, or else the defect can get infected, leading to permanent scarring and vision loss.
Water balloons hitting the eyes forcefully can also cause blunt trauma and bleeding inside the eye and other dangerous and long-lasting damage like the formation of cataract with dislocation of the crystalline lens, glaucoma, vitreous hemorrhage or even retinal detachment. An eye with severe injury from a water balloon may permanently lose vision.
Secondly, the color could cause allergic reactions to the outer portion of the eye and eyelids (conjunctivitis and dermatitis). These cause itching, redness, and swelling.
The third category is of a more serious nature and that is deep chemical burns. Natural colors, made from flower extracts, are not so harmful to the eyes. But chemical colors are also widely used. The colors contain lead oxide, copper sulfate, heavy metals, and acids, and alkalis. Alkalis, are most harmful and they cause destruction of corneal regenerating cells, causing permanent scarring (white discoloration) and even deeper damage and irreversible shrinking of the entire eye.

So it is very essential for everyone to know the precautions to be taken while enjoying the colors of Holi.

1. Use natural chemical-free colors.
2. Use protective eyewear, such as fiber glasses or sunglasses.
3. Avoid the use of large water balloons
4. If the color goes into the eye, do not rub the eyes at all.
5. Wash the face and gently open the eye and see for any cuts or bleeding. If this is present, then seek medical aid immediately without any further home intervention.
6. If there are no cuts, but powder/liquid can be seen in the eye, wash it with clean drinking water, by taking water in clean cupped hands and opening and closing the eye several times in the water. Or wash under a gentle stream of tap water. Do not splash water forcefully on the eyes. If lubricating eye drops (tear substitutes) are available, instill them several times. Do not instill any other over-the-counter drops. Do not try to remove any particles or foreign bodies with handkerchiefs or fingers. Reach an eye doctor immediately. A Family physician could help in the immediate aid, but a thorough eye check-up under a microscope by an Eye specialist is essential.
7. Do not delay medical aid, thinking that the irritation or pain will go off in a while.
These precautions, if taken on time, can be sight-saving, and not let the incidence deprive you of the joy of Holi.
Dr. Bapaye Eye Hospital wishes you all a happy, safe, and colorful Holi.
Dr. Charuta Bapaye
Dr. Bapaye Eye hospital, Nashik

69489374_372020870386250_3792353657333219328_n.jpg?time=1599794438
26/Aug/2019

 

Dr. Maneesh Bapaye, Vitreoretinal surgeon at Dr. Bapaye Hospital Presented his original work on the development of a surgical instrument known as ‘Aspiration Scraper’ in the recently concluded annual meeting of American Society of Retina Specialists at Chicago between 26-30th July 2019. The story was well-received by local press media which gave it great coverage.
Dr. Maneesh has received the Dr.S. Natarajan award for best paper in Vitreoretinal Surgery session at All India Ophthalmological Conference held at Indore in February 2019.
Dr. Maneesh Bapaye has become first eye surgeon from Maharashtra who has received 2 awards back to back at National level for the development of instruments for difficult eye surgeries


retina-sepcialist-in-nashik.jpg?time=1599794438
16/Aug/2019

Retinopathy of Prematurity (ROP) is a potentially blinding disease caused by abnormal development of retinal blood vessels in premature infants. The retina is the inward layer of the eye that gets light and transforms it into visual messages that are sent to the cerebrum. It requires screening of the babies at a very young age of 1 month by a pediatrician. The examination must continue until the retina is matured completely. Dr. Maneesh Bapaye has been associated with the Neonatal Care Unit at Civil Hospital, Nashik.

He has been visiting every week for screening the babies since August 2016. Since then awareness among doctors and patients has been increasing. Every month number of babies getting screening has been steadily increasing. Yesterday, it was the completion of 3 years of this project. Yesterday 29 babies were screened and 1 baby underwent laser treatment, single-handedly by Dr. Maneesh Bapaye.

 


bapaye-eh-1-1200x1197.jpg
29/Mar/2019

Removal of intraocular foreign body (IOFB) from the posterior segment of the eye is challenging. In addition to surgical skill, it requires specific instrumentation to grasp and remove the IOFB.

Small metallic IOFB can be removed using intraocular rare earth magnets but metallic IOFB larger than 3 mm and nonmetallic IOFBs like shotgun pellets, stones, or large glass fragments require specialized IOFB grasping forceps for removal.

Dr. Maneesh Bapaye invented s new instrument: Claw forceps for removal of IOFB. The design and case-based clinical applications of a novel IOFB removal forceps, “the claw”: consists of a titanium handle and a 27-mm, 19-G metallic shaft that houses four retractable prongs made of nitinol wire. When completely extended, the prongs measure 14 mm in length and open up to 8–8.5 mm in the widest extent. The four prongs offer a very secure grip without crushing or splintering the IOFB leading to minimal chances of IOFB slippage and inadvertent retinal trauma.


bapaye eye specialist


Contact us


Call us

094239 71283


Visit us anytime

Old Agra Rd, Behind NDCC Bank, Shalimar, Nashik, Maharashtra 422001


Send us an email

drbapayehospital@gmail.comSubscribe

Sign up for our newsletter to receive all the news offers and discounts from Bapaye Eye Clinic.
Social networks

Facebook

https://www.facebook.com/bapayeeyehospital/Contact us

Call us

+91 94239 71283


Visit us anytime

Old Agra Rd, Behind NDCC Bank, Shalimar, Nashik, Maharashtra 422001


Send us an email

eyehospitalnashik@gmail.comSubscribe

Sign up for our newsletter to receive all the news.
Social networks

Facebook

https://www.facebook.com/bapayeeyehospital