Bapaye Eye Hospital

मोतीबिंदू : अत्याधुनिक उपचार प्रणाली

डॉ.मनीष बापये

डॉ.बापये हॉस्पिटल, नाशिक

मोतीबिंदू हे जगातील अंधत्वाचे सर्वात मोठे कारण आहे. जागतिक पातळीवर ५०% पेक्षा अधिक रुग्ण मोतीबिंदूमुळे अंध होतात. या विकारावर वेळीच उपचार केल्यास नजर १००% परत येवू शकते.

मोतीबिंदू म्हणजे काय ?

डोळ्यांची रचना ही कॅमेऱ्याप्रमाणे असते. डोळ्यातील नेत्रभिंग कॅमेऱ्याच्या लेन्सप्रमाणे डोळ्यात येणारे प्रकाशकिरण नेत्रपटलावर फोकस करते. हे नेत्रभिंग निरोगी अवस्थेत पारदर्शक असते. त्यामुळे तयार होणारी प्रतिमा स्वच्छ दिसते. ज्यावेळी हे नेत्रभिंग अपारदर्शक होवू लागते, तेव्हा त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

मोतीबिंदूला इंग्रजी भाषेत Cataract म्हणले जाते. Cataract याचा अर्थ धबधबा. जणू काही वाहत्या पाण्यातून बघावे अशी नजर होत असल्याने त्याला cataract असे म्हणतात.

मोतीबिंदूची कारणे:

हा विकार मुख्यत्वे वयोमानाने होतो. काही अनुवंशिक आजारांमुळे नवजात अर्भकांमध्येही मोतीबिंदू होवू शकतो. डोळ्याला इजा होणे, डोळ्याच्या आत सूज येणे अशा विविध कारणांमुळेही मोतीबिंदूची वाढ झपाट्याने होते.

मोतीबिंदूची लक्षणे

●नजर धूसर होणे. रुग्णास झिरझिरत पडद्यातून बघावे असे दिसते. प्रखर सूर्यप्रकाश किंवा रात्री समोरील वाहनांच्या दिव्यांचा खूप त्रास होतो.

●चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो.

●जवळचे चष्म्याशिवाय चांगले दिसते. (Second Sight)

●दृष्टी खूप मंद होवून अंधत्व येते.

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केव्हा करावी ?

सर्वसामान्य लोकांची अशी समजूत असते की मोतीबिंदू पूर्ण पिकल्यावर (नजर पूर्णपणे गेल्यावर) काढावा. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदू कधीही काढून उत्तम नजर येते. कच्चा मोतीबिंदू काढणे पूर्ण सुरक्षित झाले आहे. यामुळे जेव्हा नजर कमी झाल्याने दैनंदिन व्यवहार, जसे मोबाईल बघतांना त्रास होणे, टी. व्ही. व्यवस्थित न दिसणे, रात्री गाडी चालवतांना त्रास होणे इ. नववृद्धांना होणारा त्रास होत असल्यास शस्त्रक्रिया करावी. कामकाज करण्यास बाधा येते, तेव्हा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी. तो पिकण्याची वाट बघू नये.

मोतीबिंदू उपचार:

मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने ही शस्त्रक्रिया बऱ्याच अंशी निर्धोक व ताबडतोब आणि उत्तम नजर देणारी झालेली आहे. मोतीबिंदूवर कोणताही औषधोपचार उपयोगी पडत नाही.

शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासण्याः

१) डोळ्याची सर्वागीण चिकित्सा, डोळ्याला इतर आजार व लासूर नाही याची खात्री करणे.

२) नेत्रपटलाची तपासणी व गरज पडल्यास FFA / OCT आदी आधुनिक तपासण्या.

३) लेन्सचा नंबर काढणे. लेन्सचा अचूक नंबर काढण्यासाठी Zeiss कंपनीचे IOL Master 700 , हे मशिन वापरले जाते. पारंपारिक A-Scan सोनोग्राफीपेक्षा IOL Master च्या तंत्रज्ञानाने कित्येक पटीने अचूक नंबर काढता येतो. डॉ. बापये हॉस्पिटलमध्ये IOL Master व A-Scan सोनोग्राफी या दोन्हीही पद्धती उपलब्ध आहेत. काही रुग्णांना बुबुळाच्या तपासणीसाठी Corneal topography ही टेस्ट करणे गरजेचे आहे.

४)रक्ताच्या तपासण्या करणे.

५) फिजिशियन डॉक्टरांकडून रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार नाही याचे फिटनेस सर्टिफिकेट घेणे.

शस्त्रक्रियेचे प्रकार:

फेकोइमल्सिफिकेशन(फेको):

गेल्या काही वर्षापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया फेको पद्धतीनेच केली जाते. या पद्धतीत डोळ्याच्या आवरणास २ मि.मि. ची चीर पाडली जाते. त्यातून फेको मशिनची बॉलपेनसारखी दिसणारी नळी डोळ्यात घातली जाते. ह्या नळीद्वारे अतिउच्च ध्वनीलहरी सोडून मोतीबिंदूचा चुरा केला जातो व तो शोषून घेतला जातो. अलकॉन या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या ‘ओझिल’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ‘फेको’ ची प्रक्रिया अगदी सहजतेने होते. अगदी कठीण मोतीबिंदूही सहज काढता येतो. अलकॉन कंपनीच्या सेंच्युरियन-फेको तंत्रज्ञान डॉ. बापये हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. जखम अतिशय लहान असल्याने टाके घालावे लागत नाहीत. तसेच जखमेमुळे नवीन नंबर (Astigmatism) येत नाही. शस्त्रक्रियेनंतर १ आठवड्याने चष्म्याचा नंबर काढला जातो.

रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया ( फेमटोसेकंड लेसर अस्सिस्टेड):

ह्या शस्त्रक्रिये दरम्यान, फेमटोसेकंड लेसर द्वारे, मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील अवघड क्रिया केल्या  जातात. ज्यामध्ये डोळ्यावरील ब्लेड-विरहित incision/ कट, मोतीबिंदूचे वरील आवरण काढणे (capsulotomy) अणि मोतीबिंदूचे छोटे छोटे तुकडे करणे या प्रक्रिया काही सेकंदात केल्या जातात. त्यानंतर हे तुकडे फेको मशीनने काढून घेतले जातात आणि त्याजागी लेन्स बसवले जाते.

ह्या शस्त्रक्रिये मध्ये ब्लेडचा वापर टाळता येतो. मोतीबिंदूचे छोटे तुकडे झाले असल्याने ते फेको मशीनने काढताना खूप सोपे जाते आणि ऑपरेशन नंतर येणारी सूज खूप कमी होते. त्यामुळे ऑपरेशन अतिशय सुरक्षित होते. तसेच लेन्स डोळ्याच्या आतमध्ये बिनचूक (Precision) पणे  बसते. सहाजीकच त्याचा नजरेवर सकारात्मक परिणाम होतो.

मोतीबिंदू शास्त्रक्रिये दरम्यान झाईस कॅलिस्टो या मशीनचा Image Guided Surgery साठी वापर केला जातो. हे मशीन डोळ्यामध्ये कृत्रिम भिंग (IOL) जसे बसवायचे ठरवले आहे तसेच precisely बसावे यासाठी वापरले जाते. विशेषतः टोरीक लेन्स बसवताना हे अतिशय उपयुक्त ठरते

रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि कॅलिस्टो तंत्रज्ञान नाशिकमध्ये फक्त डॉ. बापये हॉस्पिटल मध्येच उपलब्ध आहे

एक्सट्रा कॅप्सुलर कॅटरॅक्ट एक्सट्रॅकशन (E.C.C.E):

या पारंपारिक पद्धतीत बुबुळाजवळ मोठी चीर घेवून मोतीबिंदू एकसंघ काढला जातो. जखम टाके घालून शिवावी लागते. जखम भरून येण्यासाठी एक-दीड महिन्याचा कालावधी लागतो. ह्या पद्धतीचे ऑपरेशन आता केले जात नाही.

नेत्रांतर्गत कृत्रिम भिंग (Intraocular Lens / IOL):

ऑपरेशन नंतर पट्टी काढल्या- काढल्या नजर स्वच्छ दिसण्याचा चमत्कार या कृत्रिम भिंगामुळे होतो. विविध प्रकारच्या भिंगाबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपण काही मूलभूत (Fundamental) गोष्टींचा विचार करू

१. चाळीशीपूर्वी डोळ्यातील नैसर्गिक भिंगाचा आकार बदलण्याची क्षमता असते. त्यामुळे चाळीशीपूर्वी जवळचे बघण्यासाठी वेगळ्या चष्याची गरज पडत नाही. चाळीशीनंतर ही क्षमता हळूहळू कमी होत जाते. सर्वसाधारण IOL मध्ये ही क्षमता नसल्याने जवळचे बघण्यासाठी वेगळ्या चष्म्याची गरज पडते.

 २. एस्टिगमॅटिसम् (Astigmatism): बहुतांशी लोकांचे बुबुळ गोलाकार असते. परंतु काही रूग्णांच्या बुबुळाची वक्रता विविध अक्षांमध्ये असमान असते. यालाच Astigmatism असे म्हणतात. अशा रुग्णांना Cylindrical नंबरचा चष्मा वापरावा लागतो. सर्वसाधारण IOLने हा नंबर जावू शकत नाही.

 ३. IOL हे मोतीबिंदू काढून त्या जागी शस्त्रक्रियेदरम्यान बसविले जाते. त्याची काढ-घाल करावी लागत नाही. त्याप्रमाणे एकदा बसविलेले IOL आयुष्यभर टिकते.

Intraocular Lens (IOL) चे प्रकार:

मोनोफोकल लेन्स (Monofocal): ही IOL दुमडता येणारी (Foldable) किंवा न दुमडता येणारी (Rigid) असतात. परंतु आज काल foldable lens च वापरली जाते. मोनोफोकल IOL मुळे फक्त दूरचे अथवा जवळचे स्वच्छ दिसते. इतर कामांसाठी चष्मा वापरावाच लागतो.

एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस (EDOF) लेन्स: या लेन्स ने लांबचे आणि मध्यम अंतरावरच स्पष्ट दिसते. जवळच्या साठी मोनिफोकल लेन्स पेक्षा खूप कमी नंबरचा चष्मा वापरावा लागतो.

मल्टीफोकल/ ट्रायफोकल लेन्स ( Trifocal IOL): या लेन्सच्या विशिष्ट रचनेमुळे दूरचे, जवळचे तसेच मध्यम अंतरावरचे स्पष्ट दिसते. ही लेन्स दोन्ही डोळ्यांमध्ये घालणे गरजेचे असते. दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया पहिल्या डोळ्यानंतर १ ते दीड महिन्याच्या आत केली जाते. दोन्ही डोळ्यात हि लेन्स घातली कि सर्वोत्तम रिझल्ट मिळतो

टोरीक लेन्स (Toric Lens): ही लेन्स मोनोफोकल किंवा मल्टिफोकल असू शकते. ही लेन्स डोळ्यामध्ये बसवताना विशिष्ट अक्षात बसवली जाते. या लेन्सच्या रचनेमुळे Astigmatism कमी करता येते. ज्यांना cylindrical नंबर अधिक असतो त्यांना ही लेन्स न बसवल्यास ऑपरेशन नंतर दूरच्या आणि जवळच्या साठी cylindrical नंबर चा चष्मा वापरावा लागतो

मोतीबिंदू पुन्हा होतो का ?

मोतीबिंदू पुन्हा होत नाही. परंतु शस्त्रक्रियेमध्ये मूळ मोतीबिंदूचा एक पापुद्रा (Posterior Capsule) मागे सोडला जातो. याच्या आधारावर डोळ्यात IOL ठेवले जाते. कालांतराने हा पापुद्रा भुरकट व जाड होतो. ‘याग’ लेसर (Fig.6) या मशिनद्वारे ह्या पापुद्रयास छिद्र पाडून दृष्टी पूर्ववत केली जाते.

डॉ. बापये हॉस्पिटल मध्ये, मोतीबिंदू रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा

रोबोटिक मोतीबिंदू  ऑपरेशन चे नाशिक मधील एकमेव ठिकाण

●अत्युच्च विद्याविभूषित व अनुभवी डॉक्टर्स

●सर्वांगीण नेत्रचिकित्सा

●डोळ्यांची सोनोग्राफी (A-Scan & B Scan)

●Zeiss IOL Master 700 (आय.ओ.एल. मास्टर)

●Corneal Topography ( बुबुळाची टोपोग्राफी)

  • Alcon LenSx Femtolaser system (FLACS)

● अत्याधुनिक झाईस मायक्रोस्कोप प्रणाली

●Alcon Centurion Vision System (अलकॉन सेंच्युरियन-फेको पद्धती)

●Zeiss Callisto Intraoperative imaging system (झाईस कॅलिस्टो मशीन)

● सर्व प्रकारची IOL

● झाईस याग लेसर उपचार (Zeiss Yag Laser)

https://youtu.be/BTcKNLFMpZQ?si=zcj5fT7jsZTmm6zA

संकल्पना:

डॉ. मनीष बापये

डॉ. बापये हॉस्पिटल

NDCC बँकच्या मागे, हॉटेल सम्राट समोर, जुना आग्रा रोड, नाशिक ४२२००१

फोन: 0253-2506505/2509421

e-mail:drbapayehospital@rediffmail.com

Website: bapayeeyehospital.com

 सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध / CGHS संलग्न

Scroll to Top