(नेत्रपटल रक्तवाहिन्यांचे विकार)
डोळ्यांची रचना:
डोळा कॅमेरर्याप्रमाणे काम करतो. कॅमेरर्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेर्यची फिल्मच आहे. या नेत्रपटलावारिल मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपतालाच्या इतर भागंपेक्षा शंभरपट. मॅक्युलाचे आजार दृष्टिचे अतोनात नुक्सान करतात. डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते.
नेत्रपटलातील रक्तवाहिन्यांचे विकार:
व्हेन ऑक्लुजन
या आजारात डोळ्यातील रक्त बाहेर घेवून जाणार्या रक्तावाहिन्या (म्हणजे व्हेन) बंद होतात. त्यामुळे दूषित रक्तप्रवाह नेत्रपटलाबहेर जावू शकत नाही व नेत्रपटलावर रक्तस्त्राव होतो.
व्हेन ऑक्लुजनचे प्रकार:
अ) ब्रांच व्हेन ऑक्लुजन: यामध्ये नेत्रपटलावारिल लहान रक्तवाहिनी बंद होवून नेत्रपटलाच्या त्या भागात रक्तस्त्राव होतो.
ब)सेंट्रल व्हेन ऑक्लुजन: या प्रकारात नेत्रपटलावारिल मुख्य रक्तवाहिनी बंद होते. सम्पूर्ण नेत्रपटलावर रक्तस्त्राव होतो. दृष्टीचेतेला(Optic nerve) देखील मोठ्या प्रमाणात सूज येवू शकते.
नजर कमी होण्याची कारणे:
या आजाराच्या दोन्ही प्रकारांमध्ये नजर कमी जास्त होऊ शकते. याची करणे पुधिल्प्रमाणे………
अ) मॅक्युलाला सूज येणे.
ब) मॅक्युलाखाली रक्तस्त्राव होणे.
क) मॅक्युला व नेत्रपटलाच्या इतर भगांना रक्त पुरवठा करणार्या केशावाहिन्यांचा (Capillary Blood Vesseles) नाश होणे.
ड)डोळ्यामध्ये रक्तस्त्राव होणे.(Vitreous Hemorrhage)
ई) डोळ्यात दुर्धर प्रकारचा कचबिंदु होवून डोळा अंध व दुखरा बनणे. आजाराची ही पातळी क्वचितच येते. आजाराचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास ही पातळी येवू शकते.
नेत्रपटलाच्या तपासण्या
१) नेत्रपटल तपासणी (Funduscopy)
२) फंडस फोटोग्राफी- फंडस कॅमेरा या मशीनने नेत्रपटलाच्या विविध भागांचे फोटो काढून नेत्रपटलाचा नकाशा तयार केला जातो. व्हेन ओक्लुजन चे स्वरुप समजण्यास व पुढील कळामध्ये संधार्भास याचा उपयोग होतो.
३) फ्लुरेसिन अँजिओग्राफी (F. F. A)-
यामध्ये फ्लुरेसिन औषधाचे इंजेक्शन हाताच्या शिरेत देऊन ते औषध नेत्रपटलावारिल रक्तवहिन्यात आले की त्याच्या प्रवासाचे एका पाठोपाठ एक फोटो काढले जातात व त्यावरून पडद्याच्या विक्रुतिची पूर्ण कल्पना येते व उपचारांची दिशा ठरविली जाते.
४) आय. सी. जी.(ICG Angiography)
इंडोसायनीन ग्रीन हे औषध शिरेत टोचून नेत्रपटलावारिल कृष्णपटलाची अँजिओग्राफी केली जाते. ही विशेषतः मॅक्युलासाठी असते.
५) ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी (OCT)
ही अत्याधुनिक तपासणी मॅक्युलावर झालेल्या दुष्परिणाम अचूकपणे मापन करते. या तपासणीने मॅक्युलाला सूज आली असेल तर त्याचे निदान व तीव्रता मोजली जाते. त्याचप्रमाणे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम देखील O.C.T. ने बघता येते.
रेटिनल व्हेन ऑक्लुजन व नेत्रोपचार
१) डोळ्यातील इंजेक्शन
हे इंजेक्शन डोळ्याच्या आत (व्हीटियस मध्ये) दिले जाते. डोळ्यात जन्तुसंसर्ग होऊ नये म्हणून हे इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये द्यावे लागते. काही वेळा 2 इंजेक्शन एका वेळी द्यावी लागतात. काही रुग्णांमध्ये पुन्हा इंजेक्शन द्यावी लागण्याची शक्यता असते.
अ) अवस्टिन/लिसेंटिस : हे इंजेक्शन डोळ्यातील कमी न होणारा रक्त्त्राव, लेझरपूर्वी किवा नंतरही नेत्रपटलावरील पसरलेले रक्तवाहिन्यांचे जाळे कमी करणे, मॅक्युलाला व दृष्टीचेतेला येणारी सूज कमी करणे यासाठी वापरले जाते. ह्या इंजेक्शन चा काहीही दुष्परिणाम होत नाही.काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्या पूर्वी हे इंजेक्शन दिले जाते.
ब) स्टरॉइड : हे इंजेक्शन मॅक्युलाला येणारी सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. ह्यामध्ये डोळ्याचे प्रेशर (काचबिंदू) आणि मोतीबिंदू वाढण्याची शक्यता असते व त्यासाठी डॉ. च्या कडे तपासणी करावी.
क) ओझेरडेक्स : हे स्टरॉईडस च अत्याधुनिक प्रकारचे इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन डोळ्यात ६ महिने व १ वर्षापर्यंत राहते. मॅक्युलाला येणारी सूज कमी करण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. ह्यामध्ये काचबिंदू व मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी असते.
२) लेसर
लेसर म्हणजे प्रकाशातील विवक्षित लहरींची शक्ती वाढवून त्यांना सामर्थ्यशाली बनविले जाते व प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्यांच्याद्वारे उपचार केले जातात.
लेसर कसे कार्य करते ?
दृष्टिअपाचारासाठी अत्यंत सूक्ष्म आकाराचे लेसर किरण उपयोगात आणले जातात. त्यामुळे नेत्रपटलाचे नुकसान होत नाही तर –
१) फक्त विकृत रक्तवाहिन्या नष्ट केल्या जातात.(Sector Retinal Photo coagulation )
२) मॅक्युलाची सूज कमी केली जाते.(Macular grid laser )
लेसर उपचार पद्धती साधी आहे व रुग्णास त्रासदायक नाही. यामध्ये डोळ्यात औषध घालून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते व स्लिट लंप या यंत्रणा वर बसून डोळ्यात लेझर चे किरण सोडले जातात.१५-२० मिनिटात हे लेसर उपचार पूर्ण होऊन रुग्ण घरी जातो.
लेसर उपचारानंतर काही दिवस दृष्टी मंद झाली आहे असे वाटते. परंतु यामुळे सद्यस्थितीतील दृष्टी वाचवली जाते व अंधत्व टाळता येते.
३) व्हेन ऑक्लुजन व शस्त्रक्रिया
ह्या शस्त्रक्रियेला व्हीटरेक्टोमी असे म्हणतात. यामध्ये डोळ्यातील व्हीटरिअस व त्यामधील रक्तस्त्राव व नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांचे जाळे काढले जातात. ह्यामध्ये लेसारचाही उपयोग केला जातो. अत्याधुनिक (२३ किवा २५ गेज) पद्धतीने केल्यामुळे टाके न घालता शस्त्रक्रिया करता येते. हा आजार अत्यंत गंभीर असल्यामुळे नजर सुधारण्यास कालावधी लागतो. काही वेळा एकापेक्षा अधिक वेळा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. जर मोतीबिंदू असेल तर दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळेस करता येतात.
हे लक्षात ठेवा:
- रेटायनल व्हेन ऑक्लुजन हा विकार ब्लड प्रेशर (रक्तदाब) जास्त असणाऱ्या (hypertension) रुग्णांमध्ये सर्वाधिक दिसून येतो.
- आपल्या ब्लड प्रेशर ची नियमित तपासणी करून त्यावर सतत औषधे घेणे अत्यावश्यक आहे.
- या आजाराच्या रुग्णांमध्ये काही रक्तदोष असू शकतात. ज्यासाठी रक्ताच्या तपासण्या करून त्यावर फिजिशन कडून उपचार करावे लागतात.
- काही रुग्णांमध्ये उपचारानंतर देखील रेटायनल व्हेन ऑक्लुजन या आजाराची वाढ होऊ शकते. त्यामुळे उपचारानंतर ची अनेक वर्ष ठराविक कालावधीने नेत्रपटल तपासणी करणे अनिवार्य आहे.