📍 Old Agra Rd, Near Old CBS, Nashik 422001 Appointments: +91 94239 71283  |  Emergency: 0253 2506505
Book Appointment
Home › तिरळेपणा (Squint) म्हणजे काय? — कारणे व प्रकार

तिरळेपणा (Squint) म्हणजे काय? — कारणे व प्रकार

हा व्हिडिओ मराठीत आहे (इंग्रजी सबटायटलसह). असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनेल Subscribe करा.

डोळा तिरळा दिसणे हा फक्त दिसण्याचा प्रश्न नसून दृष्टीशी जोडलेला आजार असू शकतो. या व्हिडिओत डॉ. चारुता बापाये सांगतात की तिरळेपणा (squint / strabismus) म्हणजे नेमके काय.

तिरळेपणा म्हणजे काय?

सामान्यतः दोन्ही डोळे एकाच दिशेने एकत्र काम करतात. पण तिरळेपणात एक डोळा सरळ बघतो तर दुसरा आत, बाहेर, वर किंवा खाली वळलेला असतो. यालाच squint किंवा strabismus म्हणतात.

तिरळेपणाचे प्रकार

आत वळलेला डोळा (esotropia)
बाहेर वळलेला डोळा (exotropia)
वर किंवा खाली वळलेला डोळा
कायमस्वरूपी किंवा अधूनमधून दिसणारा तिरळेपणा

Have questions about तिरळेपणा (squint) म्हणजे काय? — कारणे व प्रकार?

Talk to our specialists — ethical advice, no obligation.

Book a Consultation
तिरळेपणा का होतो?

डोळ्यांच्या स्नायूंचा असमतोल, चष्म्याचा नसलेला/चुकीचा नंबर, एका डोळ्याची कमजोर दृष्टी, किंवा कधी मेंदू-नसांशी संबंधित कारणे यामुळे तिरळेपणा होऊ शकतो. तो लहान मुलांत तसेच मोठ्यांतही दिसू शकतो.

तिरळेपणाकडे दुर्लक्ष करावे का?

नाही. विशेषतः मुलांमध्ये तिरळेपणामुळे त्या डोळ्याची दृष्टी कमजोर (lazy eye) होऊ शकते. लवकर तपासणी व उपचाराने दृष्टी आणि डोळ्यांचा समतोल दोन्ही सुधारता येतात. पुढील उपचारांची माहिती squint services पानावर आहे.

तिरळेपणा आपोआप बरा होतो का?

लहान बाळांमध्ये पहिल्या काही महिन्यांतला अधूनमधूनचा तिरळेपणा कधी कमी होतो, पण कायम राहणारा तिरळेपणा तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा — तो आपोआप जात नाही.

मोठ्या माणसांनाही तिरळेपणा होतो का?

होय, आणि त्यावरही उपचार शक्य आहेत — त्यामुळे दुहेरी दिसणे कमी होऊन चेहऱ्याचा आत्मविश्वासही सुधारतो.

📅 डोळ्यांच्या तपासणीसाठी अपॉइंटमेंट: ऑनलाइन बुक करा किंवा कॉल करा 94239 71283 (सकाळी १०–रात्री ८). डॉ. बापाये हॉस्पिटल, जुना आग्रा रोड, जुना सीबीएस जवळ, नाशिक.

Your Vision Deserves Four Decades of Experience

Walk-in: 10 am – 8 pm · Call 9423971283 · Emergency 24×7

Book an Appointment